दिंडोरीमध्ये आगीत सहा गाळे खाक, तब्बल 20 लाखांचे नुकसान

गाळे जळून खाक

जानोरी : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी येथील कळवण रस्त्यावरील नाईकवाडे यांच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये सहा गाळे जळून खाक होऊन 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिंडोरी येथील नवीन मार्केट यार्डसमोरील नाईकवाडे यांच्या मालकीच्या नऊ गाळे आहे. सकाळी शिवशंभू फूडचे मालक सुरज भेरड हे नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना शेजारील त्रंबकराज अटोमोबाईल गॅरेजमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ गॅरेजचे मालक अजय जाधव यांना फोन करून सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी पाहणी करत पंचनामा केला, लागलेल्या आगीत शिवशंभू फुड्सचे तीन लाख 80 हजार, त्रंबकराज ऑटोमोबाईल्स 15 लाख, साक्षी इंटरप्राईजेस एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –