दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

बिबट्याचे दर्शन www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील चिंचखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शशिकांत फुगट यांचे तीन बोकड व एक शेळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. दोन ते तीन दिवसांपूर्वीदेखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. या घटनांनी परिसरात तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचा:

The post दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार appeared first on पुढारी.