देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

देवळा ; देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून देवळा परिसरासह तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी दि. 10 रोजी अक्षय्य तृतीया च्या निमित्ताने सकाळी 8 वाजता दुर्गा माता मंदिरात मांडव टाकून यात्रोत्सवाला सुरुवात झाली.

सकाळी 10 वाजता दुर्गा मातेच्या प्रतिमेची रथावरून मिरवणुकी द्वारे देवळा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रथा बरोबर रामलीला ची वेशभूषा करून मिरवणूकचे आकर्षक वाढवले. ठिकाणी ठिकाणी महिलांनी औक्षण केले. तर देवळा नगरपंचायतीने मिरवणुकीत होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीचे हातात फलक घेऊन मतदानाची जनजागृती केली. तसेच दुपारी तीन वाजता भव्य टांगा शर्यद भरविण्यात आली. टांगा शर्यतीत देवळा परिसरा सह इतर स्पर्धेकांनी सहभाग नोंदवून शर्यतिचे आकर्षण वाढविले. सायंकाळी देवळा नदीपात्रात यात्रे निमित्त बहुसंख्य पाळणे तसेच इतर खेळणीचे दुकाने थाटण्यात आल्याने लहान मुलांसह महिला, पुरुषांनी त्याचा आनंद लुटला.

हेही वाचा –