दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले

News

सिडको : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध महिलेला “दागिने लपवून ठेवा,” असा सांगून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन इसमांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुसुम विश्वनाथ भावसार (वय ७६, रा. अश्विननगर, सिडको) या काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास संभाजी स्टेडियमसमोरून जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेले दोन इसम त्यांच्याजवळ आले. “तुम्ही तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लपवून ठेवा,” असे सांगितले. त्यानंतर या दोघा इसमांनी वृद्धेची नजर चुकवून तिच्याजवळ असलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या व चेन घेऊन जात महिलेची फसवणूक केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले appeared first on पुढारी.