धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

मतदान, www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा निर्वाचन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती,सी. वाय. पवार यांनी दिली.

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामीण क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र व संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडुन आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक घेण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात आली होती. उपसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र ८ सप्टेंबर, २०२२ अन्वये धुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीस पूढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली होती. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली रिट याचिका क्रमांक २०२२ अन्वये धुळे जिल्हा नियोजन समितीची निवडणूक प्रकीया कार्यान्वयीत करण्यात आली आहे. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र व मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र मतदार संघाच्या निवडणूकीत दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या मतदार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तर दि. 4 जानेवारी 2022 रोजी संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात आल्यानुसार संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रीया घेण्यात येणार आहे. ही मतदान प्रक्रीया जिल्हा नियोजन समिती निवडणूक नियम १९९९ अंतर्गत घेण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) साक्री, ता. साक्री, जि. धुळे व तहसिल कार्यालय, (पहिला मजला) शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे अशी दोन मतदान केंद्र राहणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूकीसाठी सी. वाय. पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा  परिषद धुळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे, महेश जमदाडे, उपजिल्हाधिकारी भुसंपादन (सामान्य), गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान appeared first on पुढारी.