धुळे : दहावी परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस सेवा सुरू करा – महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद

महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

दहावी परीक्षांच्या दरम्यान ग्रामीण भागात अतिरिक्त एसटी बस सुविधा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सारांश भावसार यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने एस.एस.सी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. मार्च २०२३ च्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून विद्यार्थ्यांकडून अभ्यासाची उजळणी सुरू आहे.  इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा २ मार्चपासून होत असल्याने विद्यार्थी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहराच्या केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी येत असतात. अशा वेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याकरीता परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेस सुविधा पुरविण्यात यावी. तसेच नादुरुस्त बसेसची संख्या अधिक प्रमाणात असल्याने प्रवासा दरम्यान अनेक बस रस्त्यात बंद पडतात. अशा  नादुरुस्त बसेस बोर्डाच्या परीक्षा कालावधीत वापरू नये, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक न्याय परिषदेने केली आहे.

विशेष करून अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागते. साक्री, शिरपूर, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी, चोपडा, यावल या सातपुडा रांगेतील तालुक्यांमध्ये अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महामंडळाने अतिरिक्त बसेसचे नियोजन करावे, तसेच विशेष वेळापत्रक प्रसिद्ध करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती मिळेल. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचणी येतात. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरची अतिरिक्त जबाबदारी पार पाडणे अशक्य होते. अनेक शिक्षकांवर परीक्षा दरम्यान कारवाई होत असते. अनेकांचे निलंबन देखील मागील काळात झाले आहे. ते टाळण्यासाठी महामंडळाने योग्य व सुनियोजन केल्यास मुख्यते धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अडचणी दूर होऊ शकतात. त्यावर तात्काळ महामंडळाने कारवाई करवी, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेचे राज्य अध्यक्ष सारांश भावसार यांनी केली आहे. एस. टी महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष बस सुरू कराव्यात त्या संधार्भात एक वेळापत्रक देखील प्रसारित करावे तसेच नादुरुस्त बसेचचा वापर परीक्षा कालावधीत करू नये दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक यांची गैरसोय अथवा कर्तव्यापासून वंचित राहल्यास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेचे राज्य अध्यक्ष सारांश भावसार यांनी दिला.

हेही वाचा:

The post धुळे : दहावी परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस सेवा सुरू करा - महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद appeared first on पुढारी.