धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

रणरणत्या उन्हात आ. कुणाल पाटील हे थेट धुळे तालुक्यातील मोघण येथे सुरु असलेल्या तलावाच्या कामाची पहाणी करण्यास पोहचले आहेत. उन्हाची पर्वा न करता तालुक्यातील विकास कामांना गती मिळावी आणि काम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे म्हणून आ.पाटील हे तलावाच्या कामाची पहाणी करण्यासाठी पोहचल्याने मोघण परिसरात व मतदारसंघात कौतुक व्यक्त केले जात आहे.

शासनाचा लाखो-करोडो रुपयांच्या निधीतून शाश्‍वत आणि उत्कृष्ट कामे झाली पाहिजे, आणि त्याचा लाभ मतदारसंघातील शेतकरी, सर्वसमान्य जनेतला थेट झाला पाहिजे हा विचार घेवून धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील हे कार्यरत असतात. धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांबरोबरच शेतकर्‍यांच्या सिंचनाचा प्रश्‍न सुटावा म्हणून तालुक्यात विविध ठिकाणी बंधारे मंजूर करणे तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या पाझर तलावांचे मजबुतीकरण करुन त्याची दुरुस्ती करणे अशा कामांना आ. कुणाल पाटील हे प्राधान्य दिले. त्याप्रमाणे रविवार (दि.21) आ.कुणाल पाटील हे भर दुपारी रणरणत्या उन्हात धुळे तालुक्यातील मोघण येथील गाव तलावावर सुरु असलेल्या पाझर तलावाच्या कामाची पहाणी करण्यासाठी भेट दिली. कार्यकर्त्यांसह सुमारे 41 ते 42 डिग्री तापमान असतांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन संपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली. शेतकर्‍यांसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा असणारा हा मोघणचा पाझर तलाव आहे. या तलावाचे कामाला गती मिळावी म्हूणन आ.पाटील हे स्वत: पहाणी करण्यासाठी आल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला. उन्हातान्हाची पर्वा न करता आमदार विकास कामाची पहाणी करीत असल्याचे पाहून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जलसंधारण विभागाकडून मोघण ता.धुळे येथील गावतलावावर असलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून सद्या गळती थांबविणे, बांधवर दगडी पिचींग करणे अशी बांध मजबुतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या पाझर तलावामुळे मोघण, हेंदु्रण या गावांतील शेतकर्‍यांच्या शेतीचे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून मोघण गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

हेही वाचा:

The post धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी appeared first on पुढारी.