
धुळे : पुढारी वृत्तसेवा
रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील सिहोर येथे जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जात आहेत. त्यातच शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेत सहभागी होण्यासाठी जायला निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या. जेवण झाल्यानंतर रस्ता क्रॉस करत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई अभिमन जाधव (४४) या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (४५) या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या धडकेत सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परिवारातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकूल वातावरणात शिंदखेडा येथे दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा:
- सत्तासंघर्ष : उद्धव ठाकरेंची शिवसेना करतेय वेळकाढूपणा : फडणवीस
- Disney+ Hotstar भारतात डाउन! यूजर्संना लॉग इन करता येईना, पाहा नेमकं काय झालं?
- चिंचवड विधानसभेत विजय तरुणांच्या हाती
The post धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू appeared first on पुढारी.