जळगाव : भुसावळ गोळीबार प्रकरणी एक संशयित ताब्यात 

गोळीबार ,www.pudhari.news

जळगाव : भुसावळातील साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ दोन तरुणांवर गोळीबार करून पसार झालेल्या संशयीताच्या वरणगाव येथून पोलिसांनी अखेर मुसक्या बांधल्या आहेत. करण संतोष सपकाळे (रा. खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सपकाळे याच्या कट्ट्यातून झाडलेल्या गोळीने अक्षय रतन सोनवणे (वय 26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय 25, भुसावळ) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर करणसह तिघे पसार झाले होते.

तिघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा

अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) व त्यांचे दोघे मित्र चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून संशयित करण संतोष सपकाळे याने दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश जखमी झाले होते. या प्रकरणी करण सपकाळेसह संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर तसेच वरणगावचे सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या पथकाने करणला वरणगावातून अटक केली.

हेही वाचा :

The post जळगाव : भुसावळ गोळीबार प्रकरणी एक संशयित ताब्यात  appeared first on पुढारी.