धुळे: साक्री शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी शिरीष सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रदीपकुमार नांद्रे

साक्री

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत युवानेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वात बळीराजा विकास पॅनलने १४ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. आज (दि.२५) चेअरमन, व्हा.चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदी शिरीष सोनवने, तर व्हा. चेअरमनपदी प्रदीपकुमार नांद्रे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

यावेळी बळीराजा पॅनलच्या वतीने चेजरमनपदासाठी शिरीष सोनवने आणि व्हा. चेअरमन पदासाठी प्रदीपकुमार नांद्रे यांचे अर्ज दाखल झाले. तर शेतकरी सहकारी पॅनलतर्फे चेअरमन पदासाठी अॅड. नरेंद्र मराठे, व्हा.चेअरमन पदासाठी विलास देसले यांनी अर्ज दाखल केले होते. तथापि, बळीराजा पॅनलकडे स्पष्ट बहुमत असल्याने या पॅनलचे उमेदवार निर्विवादपणे विजयी झाले.

चेअरमनपदी निवड झालेले शिरीष सोनवणे यांनी भाडणे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवले आहे. तर व्हा.चेअरमनपदी निवड झालेले प्रदीपकुमार नांदे हे शेवाळीचे नेते असून त्यांच्या पत्नी सरपंच आहेत. या दोन्ही नेत्यांकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर युवानेते हर्षवर्धन दहीते यांनी आपल्याला ही संधी दिल्याबद्दल नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी आभार मानले.

हेही वाचा 

The post धुळे: साक्री शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी शिरीष सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रदीपकुमार नांद्रे appeared first on पुढारी.