Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात

बिऱ्हाड मोर्चा

नाशिक (वणी) पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याविरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथून राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात झाली आहे.

बि-हाड मोर्चा,www.pudhari.news

शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून आज (दि.16) या बिऱ्हाड मोर्चाला  सुरुवात करण्यात आली. आज वणी येथील खंडेराव महाराज मंदिर पंटागणात सर्व शेतकरी बांधव जमा झाले होते. या ठिकाणी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. राजु शेट्टी यांनी खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेवून बिऱ्हाड मोर्चाची सुरवात केली.

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्जदार आहेत. बँकेकडून जमिनींवर नावे लावणे, शेती साधनांचे लिलाव करणे आदी प्रक्रीया सुरू झाल्या आहेत. शेतक-यांचा या कारवाईला विरोध होत असून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप, वणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कड, गंगाधर निखाडे, वसंत कावळे, संतोष रेहरे, प्रकाश शिंदे यांनी मागील एक महिन्यापासून या बाबत गावोगाव जाऊन शेतकरी वर्गाला एकत्रीत केले व बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन केले.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा बिऱ्हाड मोर्चा थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवास्थानावर धडकणार आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात appeared first on पुढारी.