नगरसुल(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा– येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक असतांना देखील मतदान चांगले झाले. नगरसुल येथील माजी आमदार कै. जनार्दन देवराम पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी जनार्दन पाटील यांचे भाऊ माजी सरपंच सुनिल देवराम पाटील यांच्या पत्नी गं. भा लीलावती यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी मुलगा परिक्षीत पाटील परिवहन अधिकारी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पाटील यांच्या उत्तम पाटील, दिपक पाटील, माजी सभापती संजय पाटील या तिन्ही मुलांसमवेत मतदान केले. त्याच प्रमाणे नगरसुलचे माजी सरपंच सुभाष निकम, माजी सरपंच सतीश पैठणकर यांनी त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
नगरसूल(ता.येवला)येथील मतदान केंद्रात एकूण झालेले मतदान..
- बूथ क्र.90(zp शाळा) :- 795 पैकी- 466
- बूथ क्र.91(zp शाळा) :- 790 पैकी -476
- बूथ क्र.92(गोल्हेवाडी) :- 1185 पैकी -747
- बूथ क्र.93(zp शाळा) :- 912 पैकी- 566
- बूथ क्र.94(zpशाळा) :-1057 पैकी -649
- बूथ क्र.95 (zpशाळा):-1057 पैकी- 582
- बूथ क्र.96 (ग्रामपंचायत बूथ):- 1400 पैकी -802
- बूथ क्र.97(zpशाळा) :-1167 पैकी -697
- —————————–
8363 पैकी 4985
Total मतदान=59.65 टक्के
हेही वाचा –