नदीत आंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नी पैकी पतीचा बुडून मृत्यू

दारणा नदीपात्रातात एकाचा बुडून मृत्यू

इगतपुरी पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात अंघोळीसाठी सोबत गेलेल्या पती पत्नी पैकी पतीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आहे. यांसदर्भात इगतपुरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तत्परतेने कार्यवाही केली.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.31) दुपारी बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर वय ४५ वर्ष, त्याची पत्नी सखुबाई पुनाजी वीर वय ३८ वर्ष रा. बोर्ली वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी हे दोघे सोबतच आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुनाजी नामा वीर हे पोहत असतांना बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास सुरु केला आहे.

गेल्या आठवड्यात भावली धरणात ५ तर वैतरणा धरणात बुडून २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना घडली आहे.

हेही वाचा –