नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सातपूरच्या कामगार नगरमध्ये नेपाळी कारागीराच्या खून प्रकरणात प्रेम संबंधाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड होत आहे. महेंद्रा प्रकाश सारकी (२२) याचा खून झाला होता. हा खून महेंद्राच्या मित्राने केल्याचे सुत्रांनी सांगितले.
सातपूरच्या कामगार नगरमधील कौशल्य व्हिला येथे राहणारा महेंद्रा सारकी याचा सोमवारी (दि.१) गळा चिरून खून केला. मारेकऱ्याने महेंद्राचा गळा चिरून त्यास इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी मारेकऱ्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महेंद्रा हा एका मुलीच्या संपर्कात होता. या मुलीसोबत महेंद्राचा सोबती व त्याच्या रुममध्ये राहणारा आणखी एक जण संपर्कात होता. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. या कारणातून संशयिताने मध्यरात्री महेंद्रासोबत वाद घातला. वादानंतर त्याने महेंद्राचा गळा चिरून त्यास इमारतीवरून फेकल्याचे समजते. सातपूर पोलिस इतर सहकाऱ्यांचीही चौकशी करीत आहेत. या खुनाशी संबंधित चौकशी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- भंडारा : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार
- बारामती सहकारी बॅंकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा : बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांची माहिती
The post नाशिकमधील नेपाळी तरुणाच्या हत्येमागे प्रेम संबंधाची किनार, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड appeared first on पुढारी.