नाशिकमध्ये गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा, छायाचित्रकारांना मारहाण

गौतमी पाटील

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकमध्ये काल पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमावेळी काही मध्यधुंद हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण झाली.

येथील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमावेळी छायाचित्र काढण्यासाठी गेलेले अशोक गवळी व व्हिडीओ जर्नालिस्ट आकाश येवले हे व्यासपीठावर जाताच हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यात या दोघांना मारहाण झाली. नाशिकमध्ये झालेल्या या गोंधळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

दरम्यान गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाकडे नाशिककरांनी पाठ फिरवल्याचे दिसले.  या कार्यक्रमात निम्यापेक्षा जास्त खूर्च्या रिकाम्या होत्या.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा, छायाचित्रकारांना मारहाण appeared first on पुढारी.