नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद 

चांदवड कांदा लिलाव बंद पाडले

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव आज गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झाले, मात्र व्यापाऱ्यांनी कमी दराने कांदा पुकारल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केंद्र व राज्य सरकार वर टीकास्त्र डागले. जोपर्यंत कांद्याची 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत नाही तोपर्यंत लिलाव बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते. तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली. मात्र, तरीही खाजगी व्यापारी लिलाव सुरु झाल्यावर 1900 ते 2000 रुपये इतक्याच दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकरी संतापले आहेत. बाजार समितीच्या आवारात नाफेडने एकही केंद्र सुरु न केल्याने शेतक-यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करित मुंबई आग्रा महामार्गावर आगे कुच केली. 

हेही वाचा :

The post नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.