नाशिकमध्ये मस्करीत गुप्तांगाला मार लागल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

गुप्तांगाला मार लागल्याने मृत्यू

देवळाली कॅम्प पुढारी वृत्तसेवा : येथील स्टेशन वाडी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चेष्टा मस्करतीतून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघाही अल्पवयीन मुलांमध्ये हसी-मजाक वरुन झालेली बाचाबाची एकाच्या जीवावर बेतली आहे.

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी प्रशांत झिनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, (दि. 7) रोजी लवनीत किरणकुमार भगवाने (15) व सुमित मनोज सोळंकी( 17) हे दोघेही रात्री 9 वाजेच्या सुमारास फिल्टरेशन प्लांट येथून जात असताना त्यांच्या मध्ये चेष्टा मस्करीतून बाचाबाची झाली. यावेळी लवनीतने सुमितच्या डोक्यात मारले त्यानंतर सुमितने लवनीतच्या पोटात दोन बुक्के मारून त्याला खाली पाडले व त्याच्या गुप्तगांला हाताचा कोपरा मारला. त्यामुळे लवनीत बेशुद्ध झाला. त्यानंतर मोहित व सुमित हे उपचारासाठी लवनीतला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. या प्रकरणी पोलिसांनी संबधित मुलावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी अहिरे करीत आहे. आरोपी हा अल्पवयीन असल्या कारणाने पोलिसांनी त्यास सध्या ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मस्करीत गुप्तांगाला मार लागल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.