पुढारी ऑनलाइन डेस्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून उतरतांना लोकसभा निवडणुकीसाठी पैशांचा बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
काय म्हणाले होते राऊत ?
- मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण ! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस अशी पोस्ट करत व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता.
- त्यातून नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडत असून शिंदे गटाकडून पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.
- दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.
मुख्यमंत्र्यांची बॅंगाची केली तपासणी
आज (दि.16) पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ त्यांचा रोड शो येथे पार पडला. रोड शो पूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल होताच त्यांच्या दोन बॅगांची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली आहे. मात्र, या बॅंगामध्ये काहीही आढळले नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी राऊतांच्या आरोपांना फेटाळून लावल्याचे पाहायला मिळाले आहे.
आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेतही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला होता. नाशिकची निवडणूक ही जवळ आली आहे. येत्या 20 मेला निवडणूक असल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर दखल घेत आयोगाने आज मुख्यमंत्र्यांच्या बॅंगाची तपासणी केली.
हेही वाचा –