
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
दुसंगवाडी शिवारात मेंढरांच्या कळपात शिरलेल्या बिबट्याच्या मादीचा कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली.
दुसंगवाडी येथील भास्कर गोराणे व नंदराम गोराणे यांच्या मेंढ्यांचा कळप साईनाथ कासार यांच्या शेतात वस्तीला आहे. वाघूळ लावून सर्व मेंढ्या गोराणे यांनी संरक्षित केल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. मात्र, कळपासोबतच्या तीन कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्याला जखमी केले. जीव वाचवण्यासाठी पळालेला बिबट्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीवर जोराने धडकल्याने बेशुद्ध झाला. माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आल्यानंतर बिबट्याला तातडीने मोहदरी येथील वनउद्यानात नेण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच बिबट्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन व पंचनामा करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा:
- पाच मुलींना वाचविणारा देवदूत गहिवरला ! दोघींना वाचविता न आल्याची खंत
- उजनीतील पक्ष्यांच्या संख्येत घट ; प्रदूषण परदेशी पाहुण्यांच्या मुळावर
- नाशिक मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात
The post नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी appeared first on पुढारी.