
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडाळा शिवारातील खोडे नगर परिसरात एकाने तरुणीस फोन करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित राजन सुर्यभान सोनवणे याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने १८ ऑगस्टला विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.
पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत
गुटख्याचा साठा जप्त
नाशिक : सातपूर येथील श्रमिक नगर परिसरातून सातपूर पोलिसांनी ७६ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. कृष्णा गिरीधर कोठावदे (३६, रा. श्रमिक नगर) याच्याविरोधात अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साेमवारी (दि.२८) दुपारी साडे तीनच्या सुमारास संशयितास पकडले. त्यावेळी त्याच्याकडील दुचाकीत सुंगधीत पानमसाले, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गुटख्यासह दुचाकी जप्त केली असून तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- ‘दुष्काळ दारी’ याची सरकारला जाणीव आहे का? : जयंत पाटील
The post नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.