नाशिक : गंगासागर तलावत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

drawned

येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहरातील गंगासागर तलावात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २) दुपारी घडली. अमन अखिल शहा असे या तरुणाचे नाव आहे.

दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमन अखिल शहा (रा. आंबिया कॉलनी) हा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मात्र तलाव खोल असल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर पारेगाव व बाबुळगाव येथील पट्टीतल्या पोहणाऱ्या तरुणांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान आमनच्या मृत्यूची बातमी समजताच नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

The post नाशिक : गंगासागर तलावत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू appeared first on पुढारी.