नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं….

accident,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गावी जाणाऱ्या दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दहावा मैल परिसरात घडली. सौरभ रावसाहेब अहिरे (२१, उमरे, ता. साक्री, जि. धुळे) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ हा अमृतधाम येथील के. के. वाघ महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत हाेता. महाविद्यालयास उन्हाळी सुटी जाहीर झाल्याने ताे बुधवारी (दि.26) दुपारी साडेबारा वाजता दुचाकीने अमृतधाम येथून साक्रीच्या दिशेने जात हाेता.

आडगावलगत दहावा मैलजवळील राजस्थानी ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने सौरभच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्यास जबर मार लागल्याने त्याचा भाऊ कमलेश अहिरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅ. वैभव धूम यांनी तपासून मृत घोषित केले. आडगाव पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं.... appeared first on पुढारी.