नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
धुळे कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन नंबरप्लेट क्रमांक असलेल्या गोमांस घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला अडवून वाहनचालकास शिवीगाळ व दमदाटी करून पिकअप वाहन जाळण्यात आले. पिकअप वाहनाचे नुकसान करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या महेंद्रा बोलेरो कंपनीची पिकअप वाहन (क्र. MH-०३-CP-५४९६ व MH-४१-G-२४१२) यामध्ये वाहनचालक रहिम शेख सरफुद्दीन शेख या वाहन चालकाच्या ताब्यातील गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन शिरवाडे वणी फाट्याजवळ अडवून त्याला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर पिकअप वाहनाच्या काचा फोडून पिकअप वाहनाचे बोनेट उघडून वाहनाच्या डिझेल पाईप मधून तेच डिझेल वाहनाच्या यंत्रावर पसरवून एका ज्वलनशील पदार्थाने पिकअप वाहन जाळण्यात आले. यामध्ये पिकअप वाहनाचे नुकसान झाले असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास बाळू गुप्ते व नंदू चिंतामण शार्दूल (रा. पाचोरे वणी) तर सुरज गोकुळ वेरूळे, किशोर बाळासाहेब महाले (रा. पिंपळगाव बसवंत) या चार संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गोमांस घेऊन जाणारी पिकअप पेटवणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.