
नाशिक : गोल्ड लोन करून देण्याच्या बहाण्याने एकाने युवकाकडून दोन लाख रुपये घेत त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव सुनील होनराव (२९, रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित प्रथमेश श्याम पाटील (रा. मोदकेश्वर वसाहत) याने शुक्रवारी (दि.१७) गंडा घातला.
फिर्यादीनुसार संशयित प्रथमेश याने थत्तेनगर येथील बजाज फायनान्समधून गोल्ड लोन करून देतो, असे सांगून विविध शुल्क लागत असल्याचे सांगत वैभवकडून दोन लाख रुपये घेतले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैभवने प्रथमेशविरोधात फसवणुकीसह अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पंचवटी पाेलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- Uttarakhand Rozgar Mela | पीएम मोदींनी ७१ हजार जणांना दिले जॉब ऑफर लेटर
- Facebook-Instagram Paid: फेसबुक, इन्स्टाची मोफत सेवा बंद! दर महिन्याला द्यावे लागतील ‘इतके’ पैसे
The post नाशिक : गोल्ड लोन करुन देण्याच्या बहाण्याने दोन लाखांना गंडा appeared first on पुढारी.