नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

sinner www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत रोख 40 हजार रुपयांसह एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 5 च्या सुमारास घडली. दुशिंगपूर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बाळू फकिरा घोटेकर यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ते घोटेवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यास गेले होते आणि त्यानंतर लगेचच दोन तासांत सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास घरी परत आले. घरी आल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. कपाटातील रोख 40 हजार रुपये व सोन्याचे सुमारे एक तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. घोटेकर यांनी याबाबत वावी पोलिस ठाण्यात माहिती दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास appeared first on पुढारी.