नाशिक : जिल्हा परिषदेचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दरवर्षीप्रमाणे यंदादेखील जिल्हा परिषदेअंतर्गत महिला शिक्षिकांना थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गटस्तरावरून एकूण २६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्रस्तावांची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यांचा गुणानुक्रम देण्यात आला. शिक्षिकांचे वर्गस्तरीय कामकाज, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्ता वाढ, सहशालेय उपक्रम इत्यादीचे अवलोकन करण्यात आले. पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या किमान अटी व शर्ती तथा निकष पूर्ण केलेल्या शिक्षिकांची प्रत्येक गटातून एक याप्रमाणे एकूण १५ नावे अंतिम करण्यात आली. निवड झालेले सर्व पुरस्कारार्थी शिक्षिकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले. पुरस्कार प्राप्त शिक्षिकांचा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.

असे आहेत पुरस्कारार्थी –

बागलाण – मीनाक्षी आप्पाजी भामरे, जि. प. शाळा अंबासन

चांदवड – सविता ठाणसिंग दातरे, जि. प. शाळा बोराळे

देवळा – संगीता नामदेव कापडणीस, जि. प. शाळा वासोळपाडा

दिंडोरी – योगिता दादाजी मोरे, जि. प. शाळा म्हेळुस्के

इगतपुरी – मंगला रूपाजी शार्दुल, जि. प. शाळा टिटोली

कळवण – जानकाबाई दादाजी बागूल, जि. प. शाळा कळवण मुली

मालेगाव – भारती धर्मा जाधव, जि.प. शाळा टाकळी

नाशिक – शितल सेनाजी पगार, जि.प. शाळा मातोरी

नांदगाव – भारती सुदाम सूर्यवंशी, जि.प. शाळा जातेगाव

निफाड – शितल नागोराव बावणे, जि.प. शाळा कोकणगाव

पेठ – मंदाकिनी हरिदास शेलार, जि.प. शाळा वांगणी

सिन्नर – रविता अरुण भोईर, जि.प. शाळा कहांडळवाडी

सुरगाणा – गौरी राजेंद्र गायवन, जि.प. शाळा गाळपाडा

येवला – मनिषा अशोक वाकचौरे, जि.प. शाळा आडवाट, जळगाव नेऊर

त्र्यंबकेश्वर – सुरेखा तुकाराम साबळे, जि.प. शाळा नांदुरकीपाडा

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हा परिषदेचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.