नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप

डाकसेवक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. त्यातच आता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक यांच्या नेतृत्वाखाली डाकसेवकांनी गुरुवारी (दि. 16) व शुक्रवारी (दि. 17) देशव्यापी संपाची हाक दिली. ग्रॅच्युइटी दीड लाखाऐवजी पाच लाख करावी, सामुदायिक विमा पाच लाख रुपये करावा, एसडीबीएस पेन्शन योजनेत वाढ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपकाळात सभासदांनी सकाळी 10 ते 5 या वेळेत नाशिक जीपीओ येथे उपस्थित राहावे असे आवाहन राजाराम जाधव, कृष्णा गायकवाड, संजय उगले, सुनील जगताप, रवींद्र नागपुरे, रवींद्र क्षिरे, शकील सय्यद आदींनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप appeared first on पुढारी.