नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

खासदार गोडसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधी कोणत्याही विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकत नाही. मात्र, ड्रायपोर्ट पाहणीसाठी खा. गोडसे उपस्थित राहिल्याने यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा:

The post नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा appeared first on पुढारी.