नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार

अपघात तिरुपती, भगुर.www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात होऊन दोघे ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोघेही मृत मित्र भगूर व नानेगाव येथील असल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

विजयनगर येथून सोमवारी (दि. 18) काही मित्र दोन इनोव्हा गाड्या घेऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनास गेले होते. शुक्रवारी (दि. 22) पहाटे 5च्या सुमारास कर्नाटकमधील दावनगिरीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात गाडी उलटल्याने विजय कोरडे (रा. भगूर), नीलेश आडके (रा. नानेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील महेश गिते, प्रवीण साळवे, दीपक धात्रक, ऋतिक केदार, सचिन आव्हाड, आकाश सातपुते हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर गाडी बंगळुरू महामार्ग सोडून बाजूच्या शेतातील कच्च्या रस्त्यावर पडली होती. जखमींनी दुसर्‍या गाडीतील मित्रांना अपघाताची माहिती दिल्यावर त्यांनी धाव घेत जखमींना बाहेर काढून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी मदत केल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले.

हेही वाचा :

The post नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार appeared first on पुढारी.