नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

उंटाची तस्करी,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी – नाशिक रस्त्यावरुन २९ उंटाचा कळप नाशिक येथे गुरुवार (दि. 4) रोजी जात असतांना दिंडोरी पोलिसांनी कळपातील उटांचे मालक असलेल्या एका महिलेसह सात जणांची चौकशी करीत पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनाकडून उंटाची वैद्यकीय करुन घेतली आहे. दरम्यान वैद्यकिय प्राप्त अहवालावरुन पोलिसांनी उंट मालकांवर प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्याच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी – नाशिक रस्त्यावरुन सुमारे २९ उंटांचा जत्था हा गुरुवार (दि.4) रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास सिङफार्म दिंडोरी शिवार, ता. दिंडोरी येथून नाशिकडे जात असतांना पोलिसांनी हा जत्था थांबवला. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना दिंडोरी यांना लेखी पत्र देवून जत्थ्यामधील सर्व 29 उटांची वैद्यकीय तपासणी बाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार उंटांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याप्रमाणे प्राप्त वैद्यकीय तपासणी अहवाल डॉ. राहुल आर. कौठळे यांचेकडुन पोलिसांना प्राप्त झाला. त्यात जत्थामधील उंट हे तहानलेले व अशक्त असल्याचे तसेच त्यांना भरपूर चालवल्याने उटांच्या पायांना जखमा झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रात नमुद करण्यात आले आहे. सदरचा प्रकार हा प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा अधिनियम अंतर्गत येत असल्याने अस्लम रफिक सैय्यद (रा. औरंगाबाद नाका, नाशिक), गुटीया अब्दुल सैय्यद (रा. औरंगाबाद नाका, नाशिक), शाहरूख मेहताब सैय्यद (रा. पंचवटी नाशिक), दिपक मेहताब सैय्यद (रा. पंचवटी नाशिक), समीर गुलाब सैय्यद (रा. जालना), एजास गुलाब सैय्यद (रा. जालना), श्रीमती शाहजुर मिसऱ्या सैय्यद (रा. जालना) या सर्व उंटाच्या मालकांनी उटांना कमी प्रमाणात चारा व पाणी देवून सलग चालवल्याने उंटाच्या पायांना ठिकठिकांणी जखमा झाल्या आहेत. यावरून उटांना किती निर्दयतेने वागणुक दिल्याचे निष्पन्न होते. त्याप्रमाणे उंटाचे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.