नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास

तुरुंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागपूरस्थित व्यावसायिकाला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नाशिक येथील एकास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, तक्रारदाराला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश नागपूरचे मुख्य दंडाधिकारी यांनी दिला आहे.

या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार, बद्रीविलास ऊर्फ लाला चतुर्भुज केला (रा. नाशिक) यांनी नागपूरस्थित व्यावसायिक अनिल गांधी यांना विशिष्ट कामाच्या मोबदल्यात एक धनादेश दिला होता. तथापि धनादेश न वटल्याची तक्रार अनिल गांधी यांनी केली होती. त्यांनी या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. संबंधित तक्रार ग्राह्य धरत नागपूरचे दंडाधिकारी यांनी बद्रीविलास केला यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ३५७ (३) अंतर्गत शिक्षा जाहीर झाल्याच्या दिवसापासून दोन महिन्यांच्या आत तक्रारदाराला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारदारास जाहीर भरपाई वेळेत मिळाली नाही तर संबंधितास आणखी एक महिन्याची अतिरिक्त कैदेची तरतूद निकालपत्रात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास appeared first on पुढारी.