नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील महिलेस घरात सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धोंडगव्हाणवाडी येथील रहिवाशी महिला अलका अनिल कडांळी या घरकाम करीत असताना त्यांना दि. २९ मार्च रोजी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारासाठी वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती वडनेरभैरव पोलीस ठाण्याचे अधिकारी मयूर भामरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. आवारे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.