नाशिक : निफाडच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला कापसे बिनविराेध

निफाड www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला संपतराव कापसे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. तहसीलदार शरद घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत त्यांची निवड झाली.

निवडणूक प्रक्रियेमध्ये कापसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी घोरपडे यांनी निवड जाहीर केली. निवडीनंतर नगरपंचायत आवारात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राठी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, शिवाजी ढेपले, राजेंद्र सोनवणे, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब भवर, सचिन दरेकर, संजय क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ. अनिल कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, नगरसेवक साहेबराव बर्डे, किशोर ढेपले, पल्लवी जंगम, संदीप जेऊघाले, अरुंधती पवार, शारदा कापसे, विमल जाधव, सुलोचना होळकर, सागर कुंदे, कविता धारराव, रूपाली रंधवे, जावेद शेख, कांताबाई कर्डिले, अलका निकम, सविता तातेड, संदीप शिंदे आदी नगरसेवक तसेच संपत कापसे, रमेश जाधव, मधुकर शेलार, आसिफ पठाण, विक्रम रंधवे, दीपक गाजरे, कुमावत, मोहन जाधव, नितीन खडताळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : निफाडच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला कापसे बिनविराेध appeared first on पुढारी.