नाशिक | पुढारी 2024-04-21 15:39:39

मालती थविल pudhari.news

वंचितकडून दिंडोरी मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेवारीचे तिकीट

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची सातवी यादी जाहीर झाली असून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दिंडोरी मतदारसंघासाठी वंचित मालती थविल यांना उमेवारीचे तिकीट दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार दिंडोरीतून देण्यात आला आहे. आता वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला? याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

दिंडोरीमध्ये आता तिरंगी लढत होणार
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून डॉ. भारती पवार, शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आता नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.