
नगरसूल (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील रेंडाळे येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये वनविभाग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या असून, नेहमीच अन्नपाण्यासाठी हे वन्यप्राणी भटकंती करतात. मात्र या परिसरातील रेंडाळे गावातील बारगळ वस्तीवर चितळ पाणी पीत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत चितळाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.
मात्र, चितळ गंभीररीत्या जखमी झाले असता येथील वन्यजीवप्रेमी प्रवीण आहेर यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर वनरक्षक गोपाल राठोड व ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर यांनी तत्काळ वनकर्मचारी आप्पा वाघ, दत्तू गोसावी यांनी घटनास्थळी पाठवले. ग्रामस्थांनी खासगी वाहनाद्वारे या जखमी चितळास वन विभागाच्या स्वाधीन केले असून, त्यावर पशुवैद्यकाच्या साह्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा राजापूर येथील नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती वन अधिकार्याने दिली.
हेही वाचा :
- कार्यकर्त्याचं असंही प्रेम ! राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांना लिहिलं रक्ताने पत्र
- महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा फेरबदल होणार : भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष
- शिवभोजन थाळीची चव उतरली ! ग्रामीण भागात 37 केंद्रे बंद, 11 रद्द ; 38 केंद्रे सुरू
The post नाशिक : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी appeared first on पुढारी.