नाशिक : मराठी चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म – सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी ‘फिल्मबाजार पोर्टल’ तयार करण्यात येणार असून हे पोर्टल चाेवीस तास ३६५ दिवस सुरू राहणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी (दि.२२) फेब्रुवारी रात्री टि्वटरद्वारे सांगितले.

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये महेश कोठारे, स्वप्निल जोशी, संदीप घुगे, केतन मारु, संजय जाधव समितीमध्ये सदस्य असणार आहेत. शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही समिती करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : मराठी चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म - सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.