नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

अलका पवार,www.pudhari.news

देवळा(जि. नाशिक) ; माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अलकाबाई पवार या  सर्वाधिक 846 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार  सुरेखा पवार यांचा दारुण पराभव केला.

उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ;

(वार्ड 1) मध्ये तात्याभाऊ भदाणे 305(विजयी)
खुशाल पवार 112(पराभूत )
हर्षली बच्छाव 327(पराभूत )
गायत्री शेवाळे 90 (पराभूत )

वार्ड क्रमांक 3 मध्ये गायत्री अहिरे 202 (विजयी)
सुरेखा पवार 89 (पराभूत ) तर नेहा राहुल बागूल, मयूर सुरेश बागूल, प्रवीण जीभाऊ गांगुर्डे, अरुणा भुषण पवार, हेमंत दादाजी बागूल, कल्पना जीभाऊ शेवाळे हे सहा उमेदवार अविरोध निवडणूक आले आहेत. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

फुले माळवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी लंकेश बागुल विजयी

फुले माळवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी लंकेश बागुल हे सर्वाधिक 1027 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश शेवाळे यांचा दारुण पराभव केला. उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे व कंसात मिळालेली मते याप्रमाणे-

वार्ड 1 मध्ये 
कल्पना बच्छाव 302 (विजयी), मंगला बच्छाव 208 (पराभूत) तर संजय लक्ष्मण शेवाळे, अनिता बापु बच्छाव, सुरेखा दगडू शेवाळे, यशोदा भागाजी पवार, देवराम दादाजी बागूल, सुनील शाहना गांगुर्डे, नंदकिशोर वसंत शेवाळे, वैशाली दत्तात्रेय बच्छाव हे आठ उमेदवार याआधी बिनविरोध निवडून आले आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

हेही वाचा :

The post नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार appeared first on पुढारी.