
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून चारजण जागीच ठार झाले तर एक गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. 8 रोजी दुपारी चारच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट चारचाकी (एम. एच. 04 एफ. ए. 8291) भरगाव जात असतांना अचानक वाहनाचा पुढील टायर फुटला. यावेळी मुंबईहून नाशिककडे येणारी अपघातग्रस्त वॅगनर वाहन घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर फुटलेल्या टायरचे वाहन जम्प करुन धडकले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील एक मुलगी, एक महिला व दोन पुरुष जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा:
- निखळ जगणं ही तपश्चर्या : महेश एलकुंचवार, डॉ. अभय बंग यांच्या ‘या जीवनाचे काय करू ?’ पुस्तकाचे प्रकाशन
- मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
- औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार: अंबादास दानवेंच्या मागणीवर सरकारची ग्वाही
The post नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.