नाशिक : वणीत खासदार चषकाची धूम

vani www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

खासदार चषक 2023 चा प्रारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. येथील बु. केशव तात्या गांगुर्डे मैदानावर संताजी युवक मित्रमंडळ व एकलव्य फ्रेंडस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार चषकाचे आयोजन 3 ते 6 मे या कालावधीत करण्यात आले आहे. खेळामुळे संघटनशक्ती वाढून शारीरिक विकास होतो. एकोप्याची भावना वाढीस लागते व अशा स्पर्धांच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळते व यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतात. त्यामुळे अशा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ना. डॉ. पवार यांनी केले. यावेळी तहसीलदार पंकज पवार, वणी सपोनि. नीलेश बोडखे, योगेश बर्डे, कुंदन जावरे, महेंद्र पारख, राकेश थोरात, संदीप पवार, आबा मोरे, गौतम गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : वणीत खासदार चषकाची धूम appeared first on पुढारी.