नाशिक : वणी सापुतारा रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक, दोन ठार

वणी; पुढारी वृत्तसेवा : वणी-सापुतारा महामार्गावर पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकी जळून खाक झाली. पिकअप चालक अपघातानंतर गाडीसोडून पळून गेला. वणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वणी सापुतारा महामार्गावर अंबानेर शिवारात वणी बाजूकडून सापुताराकडे जाणारी पीकअप व सुरागण्याहून येणारी दुचाकी यांची समोरा समोर धडक होऊन दुचाकीवरील दयाराम चिमण महाले (३०, महाल पाडा, ता. सुरगाणा), जयवंत शांताराम बंगाळ (रा, बंगाळ पाडा गूही सुरगाणा) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतली. अपघातातील जखमी दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारींनी त्यांना मयत घोषीत केले. अपघातातील एकाच भागातील असून कामानिमित्त वणीकडे येत होते. पिकअप चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला असून वणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post नाशिक : वणी सापुतारा रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक, दोन ठार appeared first on पुढारी.