नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

लाचखोर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या गीता हेमंत बोकडे (वय.४५, रा. अशोकामार्ग) यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) बोकडे यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेत कारवाई केली.

एका तक्रारदार महिलेने विद्युत ठेकेदार आणि पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. बोकडे यांनी तक्रारदार महिलेला परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देते, असे सांगून त्यांच्यावर प्रभाव टाकला. तसेच त्यांच्याकडे दीड हजार रूपयांची लाच मागितली. कागदपत्रे देण्याआधी तक्रारदार महिलेकडून बोडके यांनी १ हजार स्वीकारले होते. उर्वरित ५०० रूपये पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक गायत्री जाधव, हवालदार ज्योती शार्दूल, संदीप वणवे यांच्या पथकाने सायंकाळी कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. बोडके यांच्याविरूद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :