नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिक्षक मतदारसंघासाठी १० जून रोजी मतदान घेण्यात येणार असून, १३ जूनला मतमोजणी पार पडेल.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. तर १३ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूकीसाठी १५ मे ला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. 15 मे पासून २२ मे पर्यंतच्या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. २४ मे ला अर्ज छाननी होणार आहे. २७ मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. १० जून ला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. १३ जून ला मतमोजणी होईल. १८ जून पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
नाशिक विभागात इतके मतदार
नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंरदुबार या जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, विभागातील पाचही जिल्हे मिळून एकूण ६४ हजार ८०८ शिक्षक मतदार आहेत.
हेही वाचा