नाशिक : शहापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच; आयशर व एर्टिगाचा भीषण अपघात

सिन्नर www.pudhari.news

नाशिक (दातली /सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर शिर्डी महामार्गावर शहापूर परिसरातील उड्डाणपूलाजवळ अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी (दि.6) रात्री पुन्हा आयशर ट्रक व एर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत असलेला उड्डाणपूल संपल्यानंतर अचानक एकेरी वाहतूक सुरू होते. या ठिकाणी गतिरोधक आहे, परंतु वाहन चालकांच्या गतिरोधक लक्षातच येत नाही. गतिरोधकावर अचानक हळू झालेल्या गाड्यांवर पाठीमागून येणाऱ्या गाड्या सतत धडकतात. त्यातच एकेरी वाहतूक सुरू असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचाही वाहन चालकांना वारंवार सामना करावा लागतो आहे.

सिन्नर www.pudhari.news

सिन्नर शिर्डी महामार्गावर शनिवारी (दि.6) रात्री दीडच्या सुमारास मुंबईहून शिर्डी कडे जाणारी एर्टिगा कारने गतिरोधकामुळे वाहनाचा वेग कमी केला. मात्र, याचवेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर चालकाचे वाहनावरील अचानक नियंत्रण सुटल्याने एर्टिगा कारला आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. यात एर्टिगा कारच्या पाठीमागचा बाजूचा चकनाचूर झाला. धडक दिल्यानंतर आयशर ट्रकही उलटला व आयशर मधील पाईप हे महामार्गावर पडल्याने वाहतुकी खोळंबा झाला होता. दरम्यान आयशर चालक फरार असून कार मधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची समजते.

अपघात स्थळी गोवंश मांसाने भरलेले वाहन
अपघात स्थळी शिर्डीकडून येणारा छोटा हत्ती टेम्पो मधे गोवंश मांस सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयशर ट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात आल्याने छोटा हत्ती टेम्पो चालक वाहन सोडून पसार झाला असावा. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मांस तपासणीसाठी पाठवण्यात आले असून वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यानिमित्ताने रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे मांस व गोवंश वाहतूक सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गरुड, पो. ना विनोद इप्पर ,नितीन काकड आदींनी घटनास्थळी अपघाताची माहिती घेत त्वरीत वाहतूक सुरळीत केली आहे. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम भाटजीरे व सहकाऱ्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

 

The post नाशिक : शहापूर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच; आयशर व एर्टिगाचा भीषण अपघात appeared first on पुढारी.