नाशिक : शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेततळ्यात पडल्याने मृत्यू,www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत येथून जवळच असलेल्या पाचोरे वणी तालुका निफाड येथील एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाचोरेवणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून पिकांना नियमित पाणी द्यावे लागत आहे. म्हणूनच पाचोरे वणी येथील शेतकरी जगदीश भास्कर वाटपाडे (34) हे आपल्या शेततळ्यातील बिघडलेल्या मोटरचा पाईप दुरुस्त करण्यासाठी शेततळ्याच्या काठावर गेले होते. नादुरुस्त पाईप दुरुस्त करत असतानाच अचानक पाय घसरल्याने ते खोल शेततळ्यात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईक व पोलिसांना घटनेची खबर मिळताच जगदीश वाटपाडे यांना तातडीने पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवि बारहाते पुढील तपास करत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.