नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग

सटाणा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना रविवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानाची आर्थिक हानी झाली. अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील ए टू झेड या दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. यामुळे शेजारील एका कपड्याच्या दुकानातही आगीचे लोळ पोहोचले.ए टू झेड या दुकानात टोपी,बेल्ट,रुमाल,कपडे असे विक्रीचे साहित्य होते. या सर्व साहित्याने पेट घेतल्याने आगीने अल्पावधीत रौद्र रूप धारण केले.

हे दुकान लाकडी पाटाईच्या छताच्या घरात असल्याने आग झपाट्याने पसरली. सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुरुवातीला बंबाने तीन फेऱ्या करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. यादरम्यान स्थानिक रहिवाशांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

हेही वाचा 

The post नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग appeared first on पुढारी.