नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा

बेवारस पिशवीत सापडली चांदी,www.pudhari.news

नाशिक : तीन दिवसांपूर्वी सिडको परिसरातील उत्तमनगर येथील एका गिरणीमागे सापडलेल्या बेवारस चांदीचा उलगडा करण्यात भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी संशयित संतोष ऊर्फ बंटी कदम यास ताब्यात घेतले आहे.

तिवंधा चौक येथे चांदीचे भांडे बनविण्याच्या कारखान्यातून गुरुवारी (दि. १७) रात्री चांदीची चोरी झाली होती. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयिताची ओळख पटविली. मात्र, पोलिस मागावर असतानाच संशयिताने चोरी केलेले चांदीचे भांडे एका बॅगेत ठेवून उत्तमनगर येथे राहत असलेल्या नातेवाइकाच्या घराच्या आवारात ठेवून पलायन केले होते. अखेर पोलिसांनी पांडवलेणी परिसरातून संशयित कदमला ताब्यात घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा appeared first on पुढारी.