
सिडको : जलवाहिनीचे काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोतील लेखानगर येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शंकर पवार (३५, रा. देवळाली कॅम्प) हा मजूर रविवारी (दि. २३) दुपारी 2.30 च्या सुमारास लेखानगर येथील पोस्ट ऑफिसमागील ठिकाणी दुरुस्तीचे काम करत होता.
लोखंडी पाइप बाजूला ठेवताना तेथे असलेल्या इलेक्ट्रिकच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसून तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- पुणे रेल्वे स्थानक डायरेक्टरच्या दालनाबाहेर हाणामारी
- चिन्यांनी भारतीयांना 712 कोटींना फसविले!
- जळोची : डोळ्यांच्या संसर्गाची साथ, काळजी गरजेची
The post नाशिक : सिडकोत विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.