नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्टसाठी (सीमॅट) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ एप्रिलपर्यंत, तर फी भरण्याची मुदत रात्री ११.५० पर्यंत देण्यात आली आहे. ॲडमिशन टेस्ट परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत परिमाणात्मक तंत्र, तार्किक तर्क आदी प्रश्नांचा समावेश असणार आहे.
सीमॅटच्या exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करावे. पुढील विंडोवर, नवीन नोंदणीवर क्लिक करावे. निर्देशानुसार नाव, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता यासह वैयक्तिक तपशील भरावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. परीक्षा फी भरून अर्ज सबमिट करावा. कोणत्याही शंका किंवा/स्पष्टीकरणासाठी, उमेदवार NTA हेल्प डेस्क ०११ ४०७५९००० वर कॉल करू शकता किंवा एनटीएचे संकेतस्थळ [email protected] यावर अधिक माहिती मिळवू शकतात.
हेही वाचा:
- आरोग्य : हर शख्स परेशान सा क्यूँ है?
- अर्थकारण : एक टक्का विरुद्ध इतर
- फुलांनी नव्हे, चिप्सच्या पाकिटांनी सजवली नवरदेवाची कार!
The post नाशिक : सीमॅटसाठी अर्ज करण्याची मुदत १८ एप्रिलपर्यंत appeared first on पुढारी.