
नाशिक : ध्रुवनगर येथून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास गंगापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून १२ तासांत पकडले. ज्ञानेश्वर मोतीराम दिवे (२३, रा. गोवर्धन) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
राजरत्न संजय इंदवेकर (रा. ध्रुवनगर) याच्याकडील दुचाकी चोरट्याने मंगळवारी (दि. २१) चोरली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाेध पथकातील उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलिस नाईक रवींद्र मोहिते, नाईक मिलिंद परदेशी, पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे यांच्या पथकाने तपास करून ज्ञानेश्वरला पकडले. त्याच्याकडून दुचाकीही हस्तगत केली. ज्ञानेश्वर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात आढळून आले.
हेही वाचा :
- एकलहरेजवळील सर्कल बनले ‘मौत का कुआँ’
- ‘दक्षिण गोव्यात काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाणार’
- Indian Navy : भारताचे मोठे पाऊल, दक्षिण चीन समुद्रात भारतीय पाणबुडी तैनात
The post नाशिक : सीसीटीव्ही फुटेज तपासून महागडी दुचाकी चोरणारा केला जेरबंद appeared first on पुढारी.