‘निमा’ची नवीन कार्यकारिणी जाहीर

निमा'ची नवीन कार्यकारिणी जाहीर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रशासकीय कारकीर्दीनंतर तब्बल तीन वर्षांनी घेण्यात आलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सातपूर येथील निमा कार्यालयात रविवारी (दि.३१) आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. लवकरच विविध समित्या गठीत करून त्यावरील पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.

दोन वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर ‘निमा’मध्ये सहधर्मादाय आयुक्तांनी २१ सदस्यांची जानेवारी २०२३ मध्ये एक वर्षासाठी नियुक्ती केली होती. वर्षभराचा काळ संपुष्टात आल्याने संस्थेच्या घटनेप्रमाणे नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड केली गेली. यावेळी सभासदांनी हात वर करून कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नावांना सभासदांनी हात वर करून दुजोरा दिला. या नियुक्तीची घटनेप्रमाणे नोंद घेऊन अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारही केला गेला. विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला. आयमा, नाइस, महाराष्ट्र चेंबर, लघुउद्योग भारती या संघटनांसह शासकीय अधिकारी, उद्योजक, सभासद यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, नाइसचे चेअरमन रमेश वैश्य यांनी विचार मांडले.

यावेळी निमा उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, हर्षद ब्राह्मणकर, सतीश कोठारी, मनीष रावल, जितेंद्र आहेर, संजय सोनवणे, किशोर इंगळे, ललित बूब, योगिता आहेर, एन. टी. गाजरे, एस. के. नायर, विजय कदवाने, सुरेंद्र मिश्रा, हेमंत खोंड, दिलीप वाघ, देवेंद्र राणे, रवि श्यामदासानी, कैलास सोनवणे, किरण वाजे, गोविंद झा, विजय जोशी, सुधीर बडगुजर, उमेश कोठावदे, प्रकाश ब्राह्मणकर, सुनील जाधव, अखिल राठी, शैलेश नारखेडे, राजेंद्र कोठावदे, अप्पासाहेब जाधव, विलास लिदुरे, देवेंद्र विभुते, राजेंद्र पानसरे, संजय महाजन, अजय यादव, कैलास पाटील आदी उपस्थित होते. विरल ठक्कर यांंनी आॅडिट रिपोर्ट व आर्थिक लेखाजोखा मांडला, तर राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.

कार्यकारिणीत यांचा समावेश

धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, आशिष नहार, के. एल. राठी, विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे, संदीप भदाणे, मनीष रावल, सुधीर बडगुजर, संजय सोनवणे, सतीश कोठारी, अखिल राठी, नितीन वागस्कर, एस. के. नायर, किरण वाजे, जयंत जोगळेकर, वरुण तलवार, निखील पांचाळ, कैलास पाटील, रवि श्यामदासानी.

गेल्या वर्षभरात विविध उपक्रम, प्रदर्शने, सेमिनार, फंड रेसिंग प्रोग्रॅम्स आदी उपक्रम राबवून निमाची गंगाजळी वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. भविष्यातही निमाचा लौकिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा


हेही वाचा :

The post 'निमा'ची नवीन कार्यकारिणी जाहीर appeared first on पुढारी.